कोरोनाने हरहुन्नरी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

कोरोनाने हरहुन्नरी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मुंबई : कोरोनाच्या महामारीने आणखी एक अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली आहे. ८०च्या दशकात अभिनेते ऋषी कपूर पासून ते शत्रुघ्न सिन्हापर्यंत सगळ्याच अभिनेत्यांसोबत रूपेरी पडदा गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री गीता बहल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. शनिवारी रात्री ९.४० मिनीटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अभिनेत्री गीता बहल यांना १९ एप्रिल रोजी मुंबईतल्या जुहूमध्ये असलेल्या क्रिटीकेअर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपुर्वीच अभिनेत्री गीता बहल यांच्यासोबतच त्यांचे भाऊ रवि बहल, 85 वर्षीय आई आणि त्यांच्या घरात घरकाम करणारी बाई हे सगळे कोरोनाने संक्रमित झाले होते. या तिघांना त्यांच्या घरीच आयसोलेट करून घेतलं होतं. गेल्या ७ दिवसांपासून तिघांचीही प्रकृती स्थिरावत होती. परंतू अभिनेत्री गीता बहल यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानं २६ एप्रिल रोजी त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं.

दोन दिवसांपासून त्या व्हेंटिलेटर सपोर्टवर होत्या. ६४ वर्षाच्या अभिनेत्री गीता बहल या कोरोनाविरोधात सामना करत होत्या. मात्र त्यांची कोरोनाविरोधातली झुंज अपयशी ठरली आणि शनिवारी रात्री ९.४० वाजता त्यांनी व्हेंटिलेटर सपोर्टवर असतानाच अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री गीता बहल यांनी सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज खोसला यांची गाजलेली फिल्म तुलसी तेरे आंगन की (१९७८) मधून त्यांच्या करियरची सुरवात केली होती. या फिल्ममध्ये विनोद खन्ना, नूतन आणि आशा पारेख सारख्या दिग्गज कलाकारांच्या देखील भूमिका होत्या. गीता यांनी दो प्रेमी, जमाने को दिखाना है, मैंने जीना सीख लिया, मेरा दोस्त मेरा दुश्मन, नया सफर सारख्या हिंदी फिल्ममध्ये आपली अदाकारी दाखवली होती.