मनोरंजन

मिथून चक्रवर्तीच्या तब्येतीत अचानक बिघाड; थांबवली शूटींग

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची तब्येत अचानक बिघडली. ‘कश्मीर फाइल्स’ या त्यांच्या चित्रपटाचे शुटींग मसूरी येथे चालू होते ते अचनाक थांबविण्यात आले आहे. फूड पॉयझनिंगमुळे त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात आले असून काळजी करण्यासारखे काही नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तब्येत बिघडल्यामुळे त्यांना उभे देखील राहता येत नव्हते. आपला शॉट पूर्ण होण्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. विवेक रंजन अग्नीहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ची शूटींग सुरु असताना मिथून चक्रवर्ती अचानक खाली पडले. यामुळे सिनेमाची शूटींग थांबवली.

मिथुन चक्रवर्ती मोठ्या पडद्यावर शेवटचे २०१९ मध्ये दिसले होते. विवेक अग्निहोत्री ‘ताश्कंद फाइल्स’मध्ये दिसले. हा सिनेमा माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या मृत्यूवर आधारित होता. मसूरी येथे चित्रपटाचे शूटींग सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *