महेश मांजरेकर अडचणीत; पुण्यातील यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मनोरंजन

महेश मांजरेकर अडचणीत; पुण्यातील यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासमोरील अडचणींत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. मांजरेकरांनी मारहाण केल्यानंतर संबंधित व्यक्तीने यवत पोलीस ठाण्यात मांजरेकरांविरोधात तक्रार दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सोलापूर-पुणे महामार्गावर समोरच्या वाहनचालकाने अचानकपणे ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागून येणारी काही वाहने एकमेकांना धडकली. यात एक कार महेश मांजरेकरांची होती. कारला धडक बसल्यामुळे मांजरेकर गाडीतून उतरले आणि त्यांनी एका व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर संबंधित व्यक्तीने यवत पोलीस ठाण्यात मांजरेकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर मांजरेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री ही व्यक्ती पुण्यावरुन टेंभुर्णीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी यवतच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर महेश मांजरेकर यांची सतत त्यांना ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करत होती. त्यातच सर्वात पुढच्या वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागील सगळ्या गाड्यांना एकमेकांची धडक बसली. यातच मांजरेकर यांच्या गाडीला संबंधित व्यक्तीच्या गाडीची धडक बसली. त्यानंतर मांजरेकर व त्यांचे मित्र गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी या व्यक्तीकडे नुकसानभरपाईची मागणी केली. तसंच त्यांनी या व्यक्तीला मारहाणही केली.