५७व्या वर्षी अभिनेत्याने केले पाचव्यांदा लग्न; ३१ वर्षांनी लहान आहे गर्लफ्रेंड
मनोरंजन

५७व्या वर्षी अभिनेत्याने केले पाचव्यांदा लग्न; ३१ वर्षांनी लहान आहे गर्लफ्रेंड

मुंबई : हॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे निकोलस. घोस्ट रायडर या चित्रपटातून त्याने अनेकांच्या मनात घर केले होते. तो त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. आता निकोलसने वयाच्या ५७व्या वर्षी पाचव्यांदा लग्न केल्याचे समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नुकताच निकोलसने पीपल मासिकाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सोशल मीडियावर त्याच्या लग्नाविषयी सुरु असलेल्या चर्चांवर काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर त्याने हो हे खरे आहे. मी लग्न केले आहे. आम्ही आमच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली असून खूप आनंदी आहोत असे म्हटले.

निकोलसने पाचव्यांदा लग्न केले आहे. ते ही त्याच्या पेक्षा ३१ वर्षांनी लहान असणाऱ्या जपानी गर्लफ्रेंड रीको शिबाटासोबत. रीको ही २६ वर्षांची आहे. १६ फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाहसोहळा लॉस वेगसमधील एका हॉटेलमध्ये काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. पण निकोलसने त्याच्या लग्नाबाबतची माहिती मीडियाला दिली नव्हती. निकोलसच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी १६ फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. म्हणून त्याने याच दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जाते.