कला क्षेत्रावर कोरोनाचा पुन्हा घाला; पंजाबी गायक सरदूल सिकंदर कोरोनाने निधन
मनोरंजन

कला क्षेत्रावर कोरोनाचा पुन्हा घाला; पंजाबी गायक सरदूल सिकंदर कोरोनाने निधन

पंजाब : पंजाबचे प्रसिध्द गायक सरदूल सिकंदर यांचे बुधवारी कोरोनाने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. मोहालीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत होते. मागच्या महिन्यात त्यांना त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना कोरोनाचा सांसर्ग झाला होता. त्यातच त्यांची प्रकृती ढासळली होती. कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यांची पत्नी अमर नुरीदेखील प्रसिद्ध गायिका आहेत. तर त्यांचे दोन्ही मुलगे हे देखील गायक आहेत. आलाप आणि सारंग सिकंदर अशी त्यांची नावे आहेत. सरदूल हे डिसेंबरमध्ये सिंघु बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना भेटायला गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अमर नुरीदेखील गेल्या होत्या. सिकंदर यांच्या मृत्यूमुळे त्यांचे श्रोते शोकसागरात बुडाले आहेत. त्यांच्यासोबत गाणाऱ्या गायकांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे.

सिकंदर यांच्या निधनामुळे पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. पंजाबी गायक आणि संगितकार हॅप्पी रायकोटी यांनी एक फोटो शेअर करून म्हटले की, ओए मालका, एह की कहर कमाया. तर गायिका पुजा हिने सरदूल सिकंदर यांच्या निधनाच्या वृत्तावर विश्वास बसत नाहीय. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.

पंजाबी संगित क्षेत्रात सरदूल सिकंदर यांचे मोठे नाव आहे. त्यांनी पंजाबी सिनेमांमध्ये काम देखील केले आहे. 1980 च्या दशकात त्यांनी पहिला अल्बम रोडवेज दी लॉरी आणला होता. हा अल्बम एवढा चालला की त्यानंतर सिकंदर यांनी कधीही मागेवळून पाहिले नाही. एक उत्तम गायक असण्याबरोबरच ते एक अभिनेता देखील होते.

गायक सरदुल सिकंदर यांनी 30 जानेवारी रोजी लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. सरदुल सिकंदर आणि अमर नूरीसोबत यांच्या लग्नाला 28 वर्ष पूर्ण केली होती. यानिमित्ताने अमर नूरी यांनी आपल्या फेसबुक पेजवर अनेक छायाचित्रे अपलोड केली होती.