जुन्या सर्व पोस्ट डिलीट करत दीपिकाने केली नव्या वर्षाची सुरवात; माझ्या ऑडिओ डायरीत…
मनोरंजन

जुन्या सर्व पोस्ट डिलीट करत दीपिकाने केली नव्या वर्षाची सुरवात; माझ्या ऑडिओ डायरीत…

नवीन वर्षाच्या सुरवातीलाच बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या सर्व चाहत्यांना निराश करण्याचे काम केले. 2020च्या अखेरच्या दिवशी दीपिका पादुकोणने इन्स्टाग्राम अकाऊंट, ट्विटर इतकेच नाही तर फेसबुकवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या. 52 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स असणाऱ्या दीपिकाने अशा पद्धतीने एकाच झटक्यात सर्व पोस्ट डिलीट केल्याने तिच्या सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पण आता नव्या वर्षात नवी सुरुवात करत, दीपिकाने नव्या वर्षातील पहिली पोस्ट शेअर केली आहे. व्हिडिओच्या जमान्यात दीपिकाने आपल्या आवाजाद्वारे चाहत्यांना एक संदेश दिला आहे. सोशल मीडियावर त्याने 30 सेकंदाचा एक ऑडिओ शेअर केला आहे. ऑडिओमध्ये दीपिकाने सर्वांना नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ऑडिओ डायरी नावाने पहिला संदेश शेअर करत चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हे 1 जानेवारी 2021 आहे, सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा,’ असे ही ऑडिओ डायरी शेअर करताना तिने लिहिले आहे.

आपल्या संदेशात ती म्हणते, ‘माझ्या ऑडिओ डायरीत तुम्हा सर्वांचे स्वागत. माझ्या भावना आणि विचारांचा रेकॉर्ड आहे. 2020 हे सर्व सर्वांसाठी अनिश्चिततेचे वर्ष होते. 2021 या वर्षासाठी मी माझ्या वतीने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. सर्वांना सुदृढ आरोग्य व आनंद लाभो, हॅपी न्यू ईअर.’

दीपिकाने जुन्या सर्व पोस्ट डिलीट केल्यानंतर सर्वांना धक्का बसला होता. इन्स्टाग्रामवर दीपिकाचे 52 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ट्विटरवरही हजारो लोक तिला फॉलो करतात, मग अचानक दीपिकाने सगळ्या पोस्ट का डिलीट केल्यात? असा प्रश्न सर्वांना पडला होता. यानंतर वेगवेगळे तर्कवितर्क काढले गेले होते. काहींनी दीपिकाचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाज बांधला होता, तर काहींना हा प्रमोशन फंडा असल्याचे म्हटले होते.

मात्र आता एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे दीपिकाचे अकाऊंट हॅक वगैरे झाले नव्हते, तर तिने स्वत: सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. कदाचित याच ऑडिओ डायरीची सुरुवात करण्यासाठी. सध्या दीपिका पती रणवीर सिंह सोबत राजस्थानात सुट्टी एन्जॉय करतेय. रणबीर कपूर, आलिया भटही तिच्यासोबत आहेत.

दीपिका लवकरच कबीर खान दिग्दर्शित क्रिकेटवर आधारित चित्रपटात दिसणार आहे. यात ती कपिल देव (रणवीर सिंग) यांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय शकुन बत्राच्या एका शीर्षक नसलेल्या चित्रपटातही ती दिसणार असून यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नाग अश्विनच्या प्रभास स्टारर आगामी चित्रपटामध्ये दीपिकाची महत्त्वपूर्ण भूमिका असणार असून यात अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे.