पाकिस्तानचा दारुण पराभव करत न्यूझीलंडचा विक्रम
क्रीडा

पाकिस्तानचा दारुण पराभव करत न्यूझीलंडचा विक्रम

पाकिस्तानचा दारुण पराभव करत न्यूझीलंडनं आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. ११८ गुणांसह न्यूझीलंड कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंड पहिल्यांदाच अव्वल स्थानी पोहचलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या नावावर ११६ तर तिसऱ्या क्रमांकावर अससेल्या भारतीय संघाच्या नावावर ११४ गुणांची नोंद आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तान संघाचा डाव आणि १७६ धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्ताननं पहिल्या डावांत २९७ धावांपर्यंत मजल मारली होती. या आवाहनाचा पाठलाग करताना केन विल्यमसनच्या द्विशतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडनं ६५९ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रतिउत्तरदाखल पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावांत १८६ धावांवर आटोपला. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंडचा सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. विल्यमसनच्या २३८ धावांच्या खेळीच्या बळावर न्यूझीलंडनं पहिल्या डावात ६ बाद ६५९ धावांचा डोंगर उभारला होता. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेच्या विरोधात ६२१ धावां चोपल्या होत्या. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका वगळता फक्त भारतीय संघानं ६०० धावसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. मागील १७ सामन्यापासून न्यूझीलंडचा संघ घरच्या मैदानावर अजिंक्य आहे. आज न्यूझीलंडनं लागोपाठ सहावा विजय मिळवला आहे. तर तिसऱ्यांदा क्लीन स्वीप दिला आहे. २०१७ मध्ये घरच्या मैदानावर न्यूझीलंडला पराभवचा धक्का बसला होता. मागील १७ कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडनं १३ सामन्यात विजय मिळवला आहे तर चार सामने अनिर्णीत राहिले आहे.

दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत केन विल्यमसननं पाकिस्तान संघाची धुलाई केली. कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असेलेल्या विल्यमसननं १२९.३ च्या सरासरीनं ३८८ धावांचा पाऊस पाडला आहे. त्याला मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे तर भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यात खेळण्याची शर्यत आहे. मागील १७ सामन्यापासून न्यूझीलंडचा संघ घरच्या मैदानावर अजिंक्य आहे. आज न्यूझीलंडनं लागोपाठ सहावा विजय मिळवला आहे. तर तिसऱ्यांदा क्लीन स्वीप दिला आहे. २०१७ मध्ये घरच्या मैदानावर न्यूझीलंडला पराभवचा धक्का बसला होता. मागील १७ कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडनं १३ सामन्यात विजय मिळवला आहे तर चार सामने अनिर्णीत राहिले आहे.