सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरु होताच सिराजला कोसळले रडू; पाहा व्हिडिओ
क्रीडा

सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरु होताच सिराजला कोसळले रडू; पाहा व्हिडिओ

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर राष्ट्रगीत सुरु होता भारताचा तेज गोलंदाज मोहम्मद सिराजला रडू कोसळले. मोहम्मद सिराजच्या करिअरमधील हा दुसरा टेस्ट सामना आहे. गुरूवारी सामना सुरू होण्याअगोदर तो भरपूर इमोशनल झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सिडनी टेस्ट सुरू होण्याअगोदर भारताचे राष्ट्रगीत सुरू झालं. तेव्हा सर्व खेळाडूंसोबत मोहम्मद सिराजदेखील मैदानात उपस्थित होता. राष्ट्रगीत सुरू होताच युवा गोलंदाज अतिशय भावूक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. मेलबर्न टेस्ट दरम्यान मोहम्मद शमीला दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी मोहम्मद सिराजला पदार्पण करण्याची संधी मिळाली. सिराजने या मॅचमध्ये ५ घेत धडाकेबाज पदार्पण केले.

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असतानाच मोहम्मद सिराजच्या वडिलांच दुःखद निधन झालं. ज्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियात थांबण्याचा निर्णय घेतला. सिराजने आपल्या आईशी फोनवर संवाद साधला. त्यावेळी त्यांची आई म्हणाली, ‘तेच कर जे तुझ्या वडिलांची इच्छा होती. भारतासाठी खेळ. ‘मोहम्मद सिराज प्रत्येक सामन्यादरम्यान वडिलांची आठवण काढत असतो.