प्रवीण तरडे प्रेमात जोडणार पश्चिम महाराष्ट्र-विदर्भाला ! दिग्दर्शित करणार प्रेमकथा
मनोरंजन

प्रवीण तरडे प्रेमात जोडणार पश्चिम महाराष्ट्र-विदर्भाला ! दिग्दर्शित करणार प्रेमकथा

मुंबई- मुळशी पॅटर्न चित्रपटातून जबरदस्त छाप सोडणारे दिग्दर्शक प्रवीण तरडे आपल्या पुढील चित्रपटातून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला प्रेमाच्या धाग्यात गुंफणार आहे. कधीही न हाताळलेला विषय घेऊन प्रवीण तरडे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रवीण तरडेच्या आगामी सिनेमाचं नाव, ‘कोल्हापूर टू बुलडाणा व्हाया इस्त्राईल.’ ही एक लव्हस्टोरी आहे. नुकतीच त्याने या चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रवीण तरडेचा मुळशी पॅटर्न हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमाचा हिंदी रिमेक खुद्द सलमान खान करणार असल्याच्या चर्चा आहेत.

मी माझ्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये एक लव्ह स्टोरी घेऊन येत आहे. परंतु प्रेमकथा एखाद्या सामान्य प्रेमकथेसारखी नाही माझे चित्रपट शेतकऱ्यांशी जोडलेले आहेत किंवा सामाजिक विषयांवर प्रकाश टाकतात. या प्रेमकथेतही हे मुद्दे असतील. माझ्या नव्या चित्रपटाचे नाव कोल्हापूर ते बुलढाणा व्हाया इस्त्राईल असं असल्याचे प्रवीणने सांगितले.

दरम्यान ‘इस्त्राईलमध्ये शेतीसाठी अनुकूल परिस्थिती नाही तरीही त्यांनी शेतीमध्ये बराच विकास केला आहे. माझ्या कथेतील पात्र याच विषयाचा अभ्यास करताना दिसतील आणि त्यातून एक छानशी प्रेमकथाही प्रेक्षकांच्या भेटीला येईल.