राम गोपाल वर्मांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…
मनोरंजन

राम गोपाल वर्मांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…

मुंबई : बॉलिवूड निर्माता- दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राम गोपाल वर्मा यांनी एका मुलाखतीत कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचे आभार मानले आहेत. स्पॉटबॉयच्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राम गोपाल वर्मा यांचा डी कंपनी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटानिमित्त त्यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी दाऊद इब्राहिमचे आभार मानले आहेत. डी कंपनी हा चित्रपट २०२१मध्ये करोना विषाणू सारखा पसरणार आहे आणि याच्यावर कोणतंही व्हॅक्सीन नसेल. तसंच गँगस्टरसारख्या चित्रपटासाठी मी दाऊद इब्राहिमचे आभार मानतो, असं राम गोपाल वर्मा म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. काही दिवसांपूर्वीच डी कंपनी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, अलिकडेच त्यांनी महिलांविषयी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा असंच बेताल वक्तव्य केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत.