डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह राज्यातील ५७ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
पुणे बातमी

डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह राज्यातील ५७ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या राष्ट्रपती पोलीस पदकांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदकांमधील महाराष्ट्रातील 57 पोलिसांनी ह्या राष्ट्रपती पोलीस पदकांवर मोहोर उमटवली आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये पुण्याचे सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रातील ज्या 57 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले आहेत त्यात 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक, राज्यातील 13 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक तर राज्याला 40 पोलीस पदक मिळाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तर, ”महाराष्ट्राला इतरांच्या रक्षणासाठी धावून जाण्याची परंपरा आहे. या परंपरेत शौर्य आणि धैर्यासाठीचे मानाचे पदक पटकावून आपल्या बहाद्दरांनी महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदक पटकाविणाऱ्या पोलीस अधिकारी- कर्मचारी, तसेच जीवन रक्षा आणि अग्निशमन सेवा पदक पटकाविणाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी
डॉ . रविंद्र शिसवे ( सहपोलिस आयुक्त पुणे), प्रविणकुमार पाटील (पोलिस उपायुक्त, नवी मुंबई), वसंत जाधव, (पोलिस उपायुक्त, भंडारा), कल्पना गाडेकर, (अँटी टेररिस्ट स्कॉड, सायबर सेल, नवी मुंबई), संगिता शिंदे – अल्फान्सो (पोलिस उपायुक्त, जात पडताळणी समिती), दिनकर मोहिते (पोलिस इन्स्पेक्टर, सिबिडी, बेलापूर ), मेघ : श्याम डांगे (पोलिस इन्स्पेक्टर, अक्कलकुवा, नंदुरबार), मिलिंद देसाई, (पोलिस इन्स्पेक्टर, शेड्युल ट्राईब छानणी समिती), विजय डोळस पोलिस इन्स्पेक्टर, निजामपुरा पोलिस स्टेशन), रविंद्र दौंडकर (पोलिस इन्स्पेक्टर, वाशी)

तानाजी सावंत ( पोलिस इन्स्पेक्टर, कोल्हापूर), मनीष ठाकरे (पोलिस इन्स्पेक्टर, अमरावती शहर), राजू बिडकर (पोलिस इन्स्पेक्टर, डि . बी . मार्ग पोलिस स्टेशन, मुंबई), अजय जोशी (पोलिस इन्स्पेक्टर, गुन्हे शाखा, अंधेरी, मुंबई), प्रमोद सावंत (पोलिस इन्स्पेक्टर, टेक्नॉलॉजी सेल, मुंबई), भगवान धबडगे (पोलिस इन्स्पेक्टर, देगलुर, नांदेड), रमेश कदम (पोलिस इन्स्पेक्टर खंडणी विरोधी पथक ठाणे), रमेश नागरूरकर (राखीव पोलिस दल, मुख्यालय, बुलडाणा) , सूर्यकांत बोलाडे (असिस्टंट पोलिस सबइन्स्पेक्टर, रेल्वे पोलिस घाटकोपर ), लीलेश्वर वारहडमरे (असिस्टंट पोलिस सबइन्स्पेक्टर, चंद्रपूर), भारत नाले (असिस्टंट पोलिस सबइन्स्पेक्टर, वाहतूक शाखा, सातारा )