देशात या ठिकाणी पेट्रोल शंभरी पार; पाहा कोठे आहेत किती दर
देश बातमी

देशात या ठिकाणी पेट्रोल शंभरी पार; पाहा कोठे आहेत किती दर

मुंबई : आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. देशातील चार मेट्रो शहराव्यतीरीक्त देशातील इतर भागात दर वाढले आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल सर्वाधिक महागलं आहे. येथे सामान्य पेट्रोलचे दर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार ९७.७६ रुपये प्रती लीटर आहे. तर एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोलचा दर १००.५१ रुपये प्रती लीटर पोहोचलं आहे. राजस्थानच्या जयपुरमध्ये पेट्रोलचा दर ९३.२२ रुपये प्रती लीटर तर डिझेल ८५.२९ रुपये प्रती लीटर आहे. श्रीगंगानगरमध्ये डिझेलचे दर ८९.४६ रुपये प्रती लीटर आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नवी दिल्लीतही पेट्रोलच्या दरांनी रेकॉर्ड रचला आहे. डिझेल ७६ रुपये प्रती लीटरपर्यंत पोहोचले आहेत. मुंबईतही डिझेलच्या दरांनी देखील उंची गाठली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी दर वाढलेले नाहीत.

पेट्रोलचे आजचे दर

दिल्ली ८५.७०
मुंबई ९२.२८
कोलकाता ८७.११
चेन्नई ८८.२९

डिझेलचे आजचे दर
दिल्ली ८५.८८
मुंबई ८२.८६
कोलकाता ७९.४८
चेन्नई ८१.१४