तांडवच्या वादात आता राम कदमांची उडी; म्हणतात…
मनोरंजन

तांडवच्या वादात आता राम कदमांची उडी; म्हणतात…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची तांडव ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली असून या वादात आता भाजपचे आमदार राम कदम यांनी उडी मारली आहे. या सीरिजमध्ये हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याचं म्हटलं जात असून ही सीरिज बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. यामध्येच राम कदम यांनीदेखील तांडववर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वेब सिरीजमधील अभिनेता जीशान अय्यूबने जाहीरपणे माफी मागावी आणि जोपर्यंत या सीरिजमध्ये योग्य ते बदल करण्यात येत नाही तोपर्यंत तांडववर बहिष्कार टाका, असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे. तांडवच्या पहिल्याच एपिसोडमध्ये भगवान शंकर आणि श्रीराम या हिंदू देव-देवतांची हेटाळणी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर सोशल मीडियावर #BoycottBollywood आणि #BoycottTandav हे दोन हॅशटॅग ट्रेण्ड होत आहेत.

दरम्यान, हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित तांडव ही सीरिज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत.