रुबिना दिलैक ठरली बीग बॉस महाअंतिम सोहळ्याची विजेती; तर राहुल वैद्य उपविजेता
मनोरंजन

रुबिना दिलैक ठरली बीग बॉस महाअंतिम सोहळ्याची विजेती; तर राहुल वैद्य उपविजेता

मुंबई : गेल्या 20 आठवड्यांपासून सुरु असलेल्या बिग बॉस १४चा सिझन अखेर संपला आहे. अभिनेत्री रुबिना दिलैक बिग बॉस १४ च्या महाअंतिम सोहळ्याची विजेती ठरली आहे. बिग बॉस च्या घरात राहुल वैद्य आणि रुबीना दिलैक यांच्यात शेवटपर्यंत मोठी लढत पाहायला मिळाली. मात्र, रुबीना दिलैकने बाजी मारत बिग बॉस 14व्या सीझनची विजेती ठरली. तर राहुल वैद्य उपविजेता ठरला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आपल्या खास अंदाजात अभिनेता सलमान खानने बिग बॉस सीझन 14 च्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात केली. सर्व स्पर्धकांच्या नातेवाईकांनी या महाअंतिम सोहळ्याला हजेरी लावली होती. तसेच अभिनेता रितेश देशमुख देखील बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित होता.

कमी वोटिंगमुळे बिग बॉसच्या घरातून अली गोनी बाहेरचा रस्ता धरावा लागला. यामुळे बिग बॉस च्या घरातील सदस्यांना देखील मोठा धक्का बसला होता. अली गोनीनंतर निक्की तांबोळी देखील बाहेर पडली. त्यानंतर बिग बॉस 14 ची विजेता म्हणून रुबीना दिलैकच्या नावाची घोषणा करण्यात आली.

खरतरं, बिग बॉस विजेत्याला ट्रॉफी आणि 50 लाखांची रोख रक्कम असे बक्षीस मिळते. मात्र ही रक्कम नंतर कमी होऊन 44 लाख झाली. यांचे कारण एका टास्कमध्ये शो मधील घरातील सदस्य राखी सावंत या रकमेपैकी 14 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडली. त्यामुळे रुबीनाच्या वाट्याला 44 लाख रुपये आलेत.

विजेते पदाचा मुकुट मिळवल्यानंतर रुबिना अत्यंत भावनिक झाली होती. यावेळी बोलताना तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. ” नक्कीच मी खूप आनंदी आहे. हे एक स्वप्न होते. पण विजेते पदाचा आनंद मी व्यक्त करू शकत नाहीये. ते म्हणतात ना, नशिबाचा खेळ असतो. कदाचित हे विजेतेपद माझ्याच नशिबात असावे. हा एक अत्यंत अविश्वसनीय प्रवास होता. यात मी स्वतःचा शोध घेतला आहे. आणि याचा मला अभिमान आहे.