वास्तवमधील या अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन
मनोरंजन

वास्तवमधील या अभिनेत्याचे कोरोनामुळे निधन

मुंबई : महेश मांजरेकर यांच्या वास्तव या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन झालं. त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

किशोर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला. ते नाटकांमध्ये स्त्री भूमिका करत असत. किशोर यांनी १९६०-६१ च्या सुमारास आमराई या नाटकात काम केलं. हेच त्यांचं पहिलं नाटक ठरलं. त्यानंतर त्यांनी विठ्ठल फरारी, नथीतून मारला तीर, सुंदरा मनामध्ये भरली अशा नाटकांमधून काम केलं. १९८० च्या सुमारास ते दूरदर्शनच्या गजरा, नाटक अशा कार्यक्रमांमध्येही सहभागी झाले होते.

जिस देश मे गंगा रहता है, तेरा मेरा साथ है, खाकी, हलचल, सिंघम अशा हिंदी तर सारे सज्जन, शेजारी शेजारी, हळद रुसली, कुंकू हसलं, बाळाचे बाप ब्रम्हचारी अशा मराठी चित्रपटातील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. त्यांच्या भूमिका छोट्या असल्या तरी या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. किशोर यांना हृदयविकार तसंच मधुमेहाचा त्रास होता. काही वर्षांपूर्वी त्यांची बायपासही झाली होती.