अनिश्चिततेचा खेळ ! एकाच षटकात घेतले ५ बळी; तरीही संघाचा पराभव
क्रीडा

अनिश्चिततेचा खेळ ! एकाच षटकात घेतले ५ बळी; तरीही संघाचा पराभव

क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधी एखादा फलंदाज सामना फिरवतो, तर कधी एखादा गोलंदाज हातून निसटलेला सामना एका षटकात आपल्या संघाच्या बाजूने फिरवतो. युरोपात खेळवल्या जाणाऱ्या एका क्रिकेट स्पर्धेत एका गोलंदाजाने काहीशी अशीच कामगिरी करून दाखवली. युरोपात सुरू असलेल्या १० षटकांच्या T-10 स्पर्धेत त्याने एकाच षटकात तब्बल पाच बळी टिपण्याची किमया साधली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विंटरथर संघाकडून खेळणारा श्रीलंकन खेळाडू दीश बन्नेहेका याने हा पराक्रम करून दाखवला. प्रतिस्पर्धी १ बाद ७५ अशा धावसंख्येवर असताना आठवे षटक टाकण्यासाठी दीशला बोलावण्यात आले. त्याने षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक बळी टिपला. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकला. आणि त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सलग चार बळी टिपत डबल-हॅटट्रिकही घेतली.

एवढी भन्नाट कामगिरी करूनदेखिल दीशच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पण दीशच्या गोलंदाजीचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक केले जात आहे. महान गोलंदाज लसिथ मलिंगाने दोन वेळा ४ चेंडूत ४ बळी टिपले होते. तसेच, भारताच्या दीपक चहरने ७ धावा देऊन ६ बळी टिपण्याची किमया टी-२० सामन्यात केली होती. विंडीजचा कर्टनी वॉल्श यानेदेखील १ धाव देत ५ बळी मिळवले होते. पण, दीशने एकाच षटकात शून्य धावा देत ५ बळी मिळवले.