धक्कादायक ! कारभारी लय भारी मालिकेच्या अभिनेत्रीला भरस्त्यात अज्ञातांकडून मारहाण
मनोरंजन

धक्कादायक ! कारभारी लय भारी मालिकेच्या अभिनेत्रीला भरस्त्यात अज्ञातांकडून मारहाण

राज्याच्या राजधानी मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. काही वर्षांपूर्वी मध्यरात्री फिरताना सुद्धा मुंबई सुरक्षित वाटायची. मात्र आता दिवसाढवळ्या गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र मुंबईत पुन्हा एकदा पाहायला मिळाले. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कारभारी लयभारी’मधील एका अभिनेत्रीला काही लोकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ती अभिनेत्री म्हणजे गंगा.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गंगाने तिच्यासोबत घडलेला प्रसंग व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिने अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आणि स्वतःसोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. यात तिने सांगितले आहे की, ती नेहमीपप्रमाणे तिची काम आटोपून तिच्या बसस्टॉपवर ती बसची वाट बघत होती. तितक्यात काही लोकं आली आणि तिला मारहान करायला सुरुवात केली. गंगाने कशीबशी यातून सुटका केली आणि थेट घर गाठले. मात्र तिच्यावर हल्ला का झाला आणि ते लोक कोण होते? याविषयी तिलादेखील माहिती नसल्याचे तिने सांगितले आहे. दरम्यान गंगाबरोबर घडलेला प्रसंग अतिशय धक्कादायक असून या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षा रामभरोसे आहे,असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

गंगाचं खरं नाव प्रणित हाटे आहे. गंगा आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. आता अभिनेत्री बनत ती मालिकेतही भूमिका साकारत आहे. मात्र प्रणितपासून गंगापर्यंतचा तिचा प्रवास काही सोपा नव्हता. एका मुलाखतीत गंगाने तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला होता. मी ट्रान्सजेंडर असल्याने मला अनेक वाईट अनुभवांचा सामना आजवर माझ्या आयुष्यात करावा लागला आहे. माझ्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग तर मी कधीच विसरू शकत नाही. मी एकदा एका रेल्वे स्टेशनवर रात्री 11 वाजता शुटींग करत होते. त्यावेळी दिग्दर्शकाच्या मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने अचानक पँटची झीप उघडली आणि तो अश्लील हातवारे करू लागला. त्या प्रसंगामुळे मी प्रचंड घाबरले. लोकांना अशाप्रकारे वागण्याचे धाडसच कसे येते हेच मला कळत नाही.

तथापि, ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या निमित्ताने सध्या गंगा हे नाव भरपूर चर्चेत होते.या कार्यक्रमात सूत्रसंचालनात मराठी मालिका विश्वात पहिल्यांदा एका ट्रान्सजेंडर व्यक्तीला सूत्रसंचालनाची संधी मिळाली होती.