मुंबईकरचा फर्स्ट लूक प्रदर्शित; करण जोहरने शेअर केला फोटो
मनोरंजन

मुंबईकरचा फर्स्ट लूक प्रदर्शित; करण जोहरने शेअर केला फोटो

मुंबई : बॉलिवूड चित्रपट निर्माता व दिग्दर्शक करण जोहरच्या मुंबईकर चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. करण जोहरने ट्विटरवर त्याचे पोस्टर शेअर केले आहे. करण जोहर सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

करणने हा पोस्टर ट्विटरवर ट्वीट केला आहे. पोस्टरमध्ये चित्रपटाचं नाव मोठ्या अक्षरात लिहिल असून प्रत्येक अक्षरात मुख्य भूमिका साकारणारा एक कलाकार आहे. पोस्टरमध्ये उडणारे काही पक्षी आणि मरीन ड्राइव्ह दिसत आहे. मल्याळम चित्रपट दिग्दर्शक शिबू थामीन्स या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

https://twitter.com/karanjohar/status/1344939944570019842

अभिनेता विजय सेतुपतीसुद्धा याच चित्रपटातून पदार्पण करणार आहे. पोस्टर शेअर करत, मला खात्री आहे की तुम्हाला एक जबरदस्त सिनेमॅटोग्राफी पाहायला मिळेल. संपूर्ण कलाकारांच्या टीमला शुभेच्छा. अशा आशयाचं कॅप्शन करणने दिलं आहे. या चित्रपटाची निर्मिती संतोष सिवन करत आहेत. बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनीदेखील चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे.