तर घटस्फोट होणार नाहीत; ट्विंकल खन्नाने सांगितले घटस्फोट न होण्याचे कारण
मनोरंजन

तर घटस्फोट होणार नाहीत; ट्विंकल खन्नाने सांगितले घटस्फोट न होण्याचे कारण

बॉलीवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री एकमेकांशी लग्न करतात आणि काही वर्षांनी घटस्फोट घेऊन एकमेकांपासून वेगळे होतात. अशा अनेक जोड्या आपण पाहत आहोत. मात्र सिनेसृष्टीत अशाही जोड्या आहेत जे लग्नानंतर आजही कित्येक वर्षे आनंदाने संसार करत आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि जेष्ठ अभिनेत्री हेमामालिनी, महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन, अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल या अशाच जोड्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यांच्यात अजून एक नाव घ्यावे लागेल ते म्हणजे बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना. अक्षय आणि ट्विंकलने १७ जानेवारी २००१ रोजी विवाह केला होता. त्यांच्या लग्नाला नुकतीच २० वर्षे झाली आहेत. तसेच त्यांना दोन मुलंही झाली आहेत. लग्नानंतर ट्विंकल चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती सोशल मिडीयावर खूपच सक्रीय असते. ट्विंकल खन्नाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. यात तिने घटस्फोटापासून वाचण्याचे कारणही दिले आहे.

ट्विंकल खन्नाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ट्विंकल आणि अक्षय आनंदात पोज देताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ट्विंकल अक्षयचं नाक दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत घटस्फोटापासून वाचण्याच कारण ट्विंकलने सांगितले आहे. “इन्स्टाग्रामवरील जोडी आणि खऱ्या आयुष्यातील जोडी. आपण ज्या प्रमाणे कॅमेऱ्यासमोर आनंदी राहतो तसेच जर आपण खऱ्या आयुष्यात एकमेकांकडे पाहून हसलो तर घटस्फोट होणार नाहीत #smileokplease “असे हॅशटॅग देखील दिले आहे. अशा आशयाचे कॅप्शन ट्विंकलने त्या फोटोला दिले आहे.

https://www.instagram.com/p/CMURf9aD751/?utm_source=ig_web_copy_link

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. ते नेहमी एकमेकांवर विनोद करताना दिसतात. या फोटोत ट्विंकलने सोशल मीडियावर दाखवण्यात आलेली जोडी आणि खऱ्या आयुष्यात ती जोडी कशी असते याचा फरक सांगितला आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून ३ लाख पेक्षा जास्त लोकांनी त्याला लाईक केले आहे. तर नेटकऱ्यांनी त्यांच्या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.