सलमानच्या राधेची प्रदर्शनाआधीच २३० कोटींची कमाई
मनोरंजन

सलमानच्या राधेची प्रदर्शनाआधीच २३० कोटींची कमाई

मुंबई : अभिनेता सलमान खानची त्याच्या चित्रपटांमुळे कायम चर्चा असते. लवकरच त्याचा ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करेल असा अंदाज असतानाच प्रदर्शनाआधीच राधेनं केली २३० कोटींची कमाई केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागच्या वर्षी रिलीज होणारा त्याच्या राधे हा चित्रपट लॉकडाऊनमुळे रखडला पण लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून सलमान या चित्रपटामुळेच सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. सलमान खाननं काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली होती. हा चित्रपट येत्या १३ मे ला रिलीज होणार आहे. पण त्याआधीच चित्रपटानं २३० कोटींची कमाई केली आहे. राधे चित्रपटाच्या मेकर्सनी या चित्रपटाचे राइट्स २३० कोटीं रुपयांनी झी स्टुडिओला विकले आहेत. ज्यात सॅटेलाइट, डिजिटल थिएटिकल आणि ओवरसीज राइट्सचा समावेश आहे.

सलमाननं आपल्या या बहुचर्चित चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करतानाच त्याचं नवं पोस्टरही शेअर केलं होतं. प्रभूदेवा यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या या चित्रपटात दिशा पाटनी आणि रणदीप हुड्डा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.