मनोरंजन

‘माझा जाणता राजा’ गाणे प्रेक्षकांच्या पसंतीला; ‘अनकट मराठी’ या युट्यूब चॅनलवर उपलब्ध

पुणे, ता. १८ : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत ‘अनकट मराठी’ या युट्यूब चॅनलने एक नवीन मराठी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. ‘माझा जाणता राजा’ असे गाण्याचे नाव आहे. मायभूमी भयभीत होता यवन मातला; सह्याद्रीचा एक कडा मग पेटून ऊठला, असे गाण्याचे बोल आहेत. गाण्यामध्ये मराठी अभिनेता उपेंद्र लिमये, ऋषभ मोरे, तन्मय पटेकर, गायत्री कोरपे, श्रद्धा टक्के-पाटील, स्नेहल प्रधान, सोहम चाकणकर आदींनी अभिनय केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रेक्षकांच्या पसंतीला हे गाणे उतरत असून आशिष गायकवाड आणि जयपाल गायकवाड यांनी या गाण्याची निर्मीती केली आहे. कपिल जोंधळे यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले असून प्रशांत सातोसे आणि रिमी धर यांनी हे गाणे गायले आहे. तर, गाण्याला दुर्गेश राजभट्ट आणि डी जे वभैव यांनी संगितबद्ध केले आहे.

पहा संपूर्ण गाणं

शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आधी दोन दिवस म्हणजेच १७ फेब्रुवारीला हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. त्यामुळे शिवजयंतीला महाराजांवर आलेले गाणे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत असून त्यांच्या पसंतीलाही उतरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आणि उर्जास्त्रोत आहेत. त्यामुळेच हे गाणे बनविण्यात आले असून हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असल्याचा आनंद असल्याची भावना निर्माते जयपाल गायकवाड यांनी बोलून दाखविली.

Leave a Reply

Your email address will not be published.