सुशांतसिंह राजपूत प्रकरण: एनसीबीकडून ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल; रियाच्या नावाचा समावेश
मनोरंजन

सुशांतसिंह राजपूत प्रकरण: एनसीबीकडून ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल; रियाच्या नावाचा समावेश

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एनसीबीने न्यायालयासमोर ३० हजार पानांचं आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीच्या चार्जशीटमध्ये चार्जशीटमध्ये रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत यांच्यासह एकूण 33 जण आरोपींच्या नावासह 33 जणांचा समावेश आहे. तर बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांच्या फक्त जबाबांचा समावेश आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग यांसारख्या बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींचा जबाबाचा समावेश आहे. आरोपपत्रात त्यांचा आरोपी म्हणून उल्लेख केलेला नाही.
त्याच्या मृत्यूवरून नंतर प्रचंड वादविवाद झाले. सुशांतने आत्महत्या केलेली नसून, त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोपही अनेकांनी केला होता.यात प्रकरणात एनसीबीने तपास सुरू केला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी धाडी टाकत एनसीबीने ड्रग्ज जप्त केलं होतं. तसेच रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह अनेकांना अटक करण्यात आली होती. रिया आणि शौविक यांच्यावर सुशांतला ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे.

सुशांत सिंह राजपूत याने 14 जूनला वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केली. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती सुशांतच्या घरी काम करणाऱ्या नोकराने दिली आहे. सुशांत डिप्रेशनमध्ये होता त्याच्यावर उपचार सुरू होते. सुशांतच्या घरी पोलिसांना काही औषधे मिळाली आहे त्यावरुन हा अंदाज लावण्यात आलेला आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सुशांतच्या घरात सुसाइड नोट सापडलेली नाही.