आज जी विमानं व्हॅक्सीनचे लाखो डोस घेऊन जगभरात जात आहेत, ती…
देश बातमी

आज जी विमानं व्हॅक्सीनचे लाखो डोस घेऊन जगभरात जात आहेत, ती…

नवी दिल्ली : ”देशातील नागरिकांना लस मिळत नसताना तुम्ही ती अन्य देशांना का देत आहात. लसनिर्मितीच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर का करत नाही, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने, केंद्रसरकारसह सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेकला विचारला आहे. याच बरोबर, कोरोना लसीकरणासाठी वर्गिकरण करण्यामागचे नेमके कारण काय, असा सवाल केंद्र सरकारला विचारला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं आहे. ते बजेटमधील डीपीआयआयटीशी संबंधित घोषणांसंदर्भात एका वेबिनारला संबोधित करत होते. ”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज जी विमानं व्हॅक्सीनचे लाखो डोस घेऊन जगभरात जात आहेत, ती रिकामी येत नाहीत. ते आपल्या सोबतीने भारताप्रति विश्वास आत्मीयता, स्नेह, आशीर्वाद आणि एक भावनात्मकता घेऊन येत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, या वर्षीच्या अर्थसंकल्पात PLI स्किमशी संबंधित योजनांसाठी जवळपास 2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उत्पन्नाच्या सरासरी 5 टक्के इंसेंटिव्हच्या स्वरुपात देण्यात आले आहेत. केवळ पीएलआय स्कीमच्या सहाय्यानेच येणाऱ्या पाच वर्षांत जवळपास 520 बिलियन डॉलरचे उत्पादन भारतात होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात संयुक्त राष्ट्रांकडून 2023 हे ‘International Year of Millets 2023’ घोषित केल्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले, भारताच्या या प्रस्तावाचे 70 हून अधिक देशांनी समर्थन केले आहे. मोदी म्हणाले, आपण योगाला ज्या पद्धतीने संपूर्ण जगभर पसरवले त्याच पद्धतीने आपण सर्वजण एकत्रितपणे तृणधान्यही (भरड) संपूर्ण जगात पोहोचवू शकतो. ज्या पद्धतीने कोरोनापासून वाचविण्यासाठी मेड इन इंडिया व्हॅक्सीन आहे. त्याच पद्धतीने लोकांना आजारी पडण्यापासून वाचविण्यासाठी भारतात तयार होमारे तृणधान्यही तेवढेच उपयोगी आहे.

आज भारत एक ब्रँड झाला आहे. आता आपल्याला फक्त आपल्या ब्रँडची ओळख निर्माण करायची आहे. आता तुम्हाला जास्त कष्ट करण्याची गरज आहे. जर आपल्याला काम करायचे असेल तर आपल्याला उत्पादन गुणवत्ता करावी लागेल. मागील वर्षी, आम्ही मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक घटक तयार करण्यासाठी #PLIScheme लाँच केली होती. महामारीच्या काळातही या क्षेत्राने मागील वर्षी ₹ 35000 कोटी उत्पादन घेतले. इतकेच नव्हे तर कोरोना काळातही या क्षेत्रात सुमारे १₹०० कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक झाली आहे. असेही, पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.