सैराट मधील बाळ्या घालणार गस्त; येतोय नवा चित्रपट
मनोरंजन

सैराट मधील बाळ्या घालणार गस्त; येतोय नवा चित्रपट

मुंबई : सैराटफेम बाळ्या म्हणजेच तानाजी गालगुंडे आता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. गस्त या चित्रपटात तानाजी प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गस्त या चित्रपटात तानाजीला पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तानाजी म्हणाला, मी गस्त या चित्रपटात अमर नावाच्या मुलाची भूमिका साकारतोय. तो एका मुलीच्या प्रेमात आहे आणि ज्या गावात राहतोय त्या गावात पहारा देत असताना त्या मुलीला तो चोरून भेटत असतो. त्यांची प्रेमकथा पुढे काय वळण घेते हे प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी एका गावाकडच्या मुलाची भूमिका निभावतोय आणि प्रेक्षकांना देखील ती नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.

गस्त हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अनेक जबरदस्त कलाकारांची फौज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २८ फेब्रुवारी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीजवर प्रदर्शित होणार आहे.