शिवराय हे नावच सर्वसमावेशक; रिंकू राजगुरूकडून शिवजयंतीच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा
मनोरंजन

शिवराय हे नावच सर्वसमावेशक; रिंकू राजगुरूकडून शिवजयंतीच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा

सैराटफेम अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत असते. सोशल मिडीयावर देखील ती खूपच सक्रीय असते. अल्पावधीतच तिने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. चाहतेही तिला भरभरून प्रतिसाद देत असतात. तसेच ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. रिंकूने शिवजंयतीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रिंकूने मराठमोळ्या अंदाजात शिवजयंतीच्या शुभेच्छा देत पोस्टमध्ये लिहिले आहे की, छत्रपती शिवराय हे नावच सर्वसमावेशक आहे. जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणे महत्वाचे आहे. स्वार्थासाठी नव्हे तर स्वराज्यासाठी लढणे महत्वाचे आहे. राजा माझा सुखकर्ता… शिवजयंतीच्या शुभेच्छा…

https://www.instagram.com/p/CLdftxwpa9j/?utm_source=ig_web_copy_link

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा ॲमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे.

छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे.

रिंकू राजगुरूने सैराट चित्रपटासाठी ऑडिशन दिले त्यावेळी ती फक्त १३ वर्षांची होती. आता रिंकू चांगलीच मोठी झाली आहे. सैराटच्या यशानंतर तिला चांगल्या चित्रपटाच्या ऑफर्स आल्या. या सिनेमानंतर तिने कागर, मेकअप या चित्रपटात काम केले. तसेच ती लारा दत्तासोबत हिंदी वेबसीरिज हंड्रेडमध्येदेखील झळकली होती.