अमिताभ यांनी शेअर केला जुना फोटो; सुपरस्टार असलेल्या चिमुकल्याला ओळखलंत का?
मनोरंजन

अमिताभ यांनी शेअर केला जुना फोटो; सुपरस्टार असलेल्या चिमुकल्याला ओळखलंत का?

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक जूना फोटो शेअर केला आहे. हा फोटो चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे म्हटले जात आहे. पण या फोटोमध्ये दिसत असलेल्या लहान मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या तो मोठा सुपरस्टार असून तुम्हीही त्याला ओळखले नसेल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हा फोटो शेअर करत अमिताभ यांनी मी पहिल्यांदाच एका चित्रपटासाठी गाणे गायले होते. मिस्टर नटवरलाल चित्रपटात मी, मेरे पास आओ हे गाणे गायले. संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांच्या सोबत रिहर्सल करत होतो. आमच्यासोबत बसलेला हा मस्तीखोर मुलगा हृतिक रोशन आहे. या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

हा फोटो १९७९ साली प्रदर्शित झालेल्या मिस्टर नटवरलाल चित्रपटाच्या सेटवरील आहे. या चित्रपटात अमिताभ यांनी पहिल्यांदाच गाणे गायले होते. बिग बींनी शेअर केलेल्या फोटोमध्ये हृतिक रोशनला ओळखणे देखील कठीण झाले आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहते त्यावर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.