गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर येणार वेल डन बेबी; ट्रेलर प्रदर्शित
मनोरंजन

गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर येणार वेल डन बेबी; ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता पुष्कर जोग यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट वेल डन बेबी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वेल डन बेबी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आधुनिक जगातील एक तरुण जोडप्याच्या कथेची झलक आहे. हे जोडपं आपल्या लग्नाचा उद्देश शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण, नशीबच त्यांना बाळाच्या रुपात तो उद्देश देऊ करते. आदित्य आणि मीरा यांचं आयुष्य आणि नवरा-बायको म्हणून त्यांच्यासमोरील आव्हाने यात डोकावण्याची संधी या ट्रेलरमुळे मिळते.

आधीच गुंतागुंत झालेल्या या नात्यात भर पडते आदित्यच्या सासूची. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी साकारलेल्या काहीशा सगळ्यात लुडबुड करणाऱ्या सासूमुळे ही कथा अधिकच रंजक आणि गमतीशीर बनली आहे. प्रियंका तंवर यांचे दिग्दर्शन असलेल्या या फॅमिली सिनेमाबद्दलची उत्सुकता फारच वाढली आहे. भारतातील प्राइम सदस्यांना ९ एप्रिल २०२१ पासून हा चित्रपट पाहाता येणार आहे.