ICC Ranking : वनडे रँकिंगमध्ये बुमराहची घसरण, ऋषभची भरारी
क्रीडा

ICC Ranking : वनडे रँकिंगमध्ये बुमराहची घसरण, ऋषभची भरारी

नवी दिल्ली : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराहची घसरण झाली आहे. तर कर्णधार विराट कोहलीने पहिले स्थान कायम राखले आहे. बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरला आहे. आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे 56 आणि 66 धावा काढलेल्या कोहलीच्या खात्यात 870 गुण आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारताचा मर्यादित षटकांचा उप-कर्णधार रोहित शर्मा तिसर्‍या क्रमांकावर असून तो पाकिस्तानच्या बाबर आजमच्या मागे आहे. तर, के एल राहुलने ३१व्या स्थानावरुन २७व्या स्थानावर झेप घेतली आहे. अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने ४२वे स्थान मिळवले असून ऋषभ पंतने पहिल्या १००फलंदाजांमध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ४२ धावा देऊन ३ फलंदाज बाद करणाऱ्या भूवनेश्वर कुमारने गोलंदाजांमध्ये ११व्या स्थानी उडी घेतली आहे. शार्दुल ठाकूर ८०व्या स्थानी पोहोचला आहे. शार्दुलने इंगलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 67 धावांत 4 फलंदाजांना माघारी धाडले होते.

फलंदाजांच्या टी-20 क्रमवारीत राहुल आणि कोहली अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहे. अष्टपैलू आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत एकही भारतीय खेळाडू अव्वल दहा जणांमध्ये नाही. कसोटी क्रमवारीत फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स नंतर दुसरे स्थान कायम राखला आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा तिसऱ्या तर, अश्विन चौथ्या क्रमांकावर आहे.