बँकिंग आणि कराच्या नियमांमध्ये मोठे बदल; नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम
काम-धंदा

बँकिंग आणि कराच्या नियमांमध्ये मोठे बदल; नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम

1 जुलैपासून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. आजपासून देशात बँकिंग आणि कराच्या नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्यांना आता या नव्या बदलांनी बोजा वाढणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्टेट बँक ऑफ इंडिया
बेसिक सेव्हिंग बँक डिपॉजिट खातेधारकांना महिन्यातून 4 वेळा एटीएमचा वापर मोफत करता येणार आहे. त्यानंतर एटीएमचा वापर केल्यास प्रत्येक व्यवहाराला 15 रुपये व जीएसटी द्यावा लागणार आहे. चेकबुकसाठीही अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत.

आयडीबीआय बँक
आयडीबीआय बँकेने 1 जुलैपासून आपल्या चेक लीफ चार्ज, सेव्हिंग अकाउंट चार्ज आणि लॉकर चार्जमध्ये बदल केला आहे. सेमी अर्बन आणि ग्रामीण भागातील खातेधारक आता बँकेत फक्त 5 वेळाच पैसे जमा करू शकणार आहेत. .

LPG गॅसच्या किंमतीत वाढ
सरकारी तेल कंपन्यांनी घरी वापरल्या जाणार्‍या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. वाढलेल्या किमतींमुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आता 834 रुपयांवर पोहोचले आहेत.

कार आणि दुचाकी महागणार
मारुती आणि हिरोच्या गाड्यांच्या किंमती वाढणार आहे. हिरोच्या दुचाकींच्या एक्स-शो रूम किंमतीत 3 हजार रुपयांची वाढ होऊ शकते.

50 लाख रुपयांच्यावरील खरेदीवर टीडीएस कापला जाणार
50 लाखांवरील खरेदीवर 0.10 टक्के टीडीएस कापला जाणार आहे. मागील वर्षी एखाद्याचा 10 कोटींचा टर्नओव्हर असेल, तर तो यावर्षी 50 लाखांपेक्षा अधिकचा माल खरेदी करू शकेल. यावर जी विक्री होईल त्यावर टीडीएस कापला जाईल.

लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज
लर्निंग लायसन्स बनवण्यासाठी आता आरटीओत जाण्याची गरज नाही. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर घरातूनच चाचणी दिली जाऊ शकणार आहे. चाचणीत पास झाल्यानंतर लर्निंग लायसन्स घरी पाठवून दिले जाणार आहे.

सोन्याच्या दागिन्याला यूनिक ओळख
सोन्याच्या व्यवहारात फसवणूक होऊ नये म्हणून सोन्याच्या प्रत्येक दागिन्याला यूनिक ओळख तयार केली जाणार आहे. दागिने हरवल्यास किंवा चोरी झाल्यास या यूनिक ओळखीमुळे ओळख पटवण्यात मदत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक दागिन्याला यूनिक ओळख (यूआईडी) देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

सिंडिकेट बँक ग्राहकांना नवा IFSC कोड
सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली आहे. त्यामुळे आता सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना नवा IFSC कोड वापरावा लागणार आहे.