बीएसएनएलचा प्रीपेड प्लान लाँच; प्रतिदिन 2 जीबी डेटा केवळ 200 रुपयांत
लाइफफंडा

बीएसएनएलचा प्रीपेड प्लान लाँच; प्रतिदिन 2 जीबी डेटा केवळ 200 रुपयांत

नवी दिल्ली : जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने नवीन प्रीपेड प्लान लाँच केला आहे. या नव्या प्रीपेड प्लानची किंमत 199 रुपये आहे. यासह, कंपनीने पीव्ही 186 प्लॅन आपल्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकण्याची घोषणा देखील केली आहे. 199 रुपयांच्या या प्लानमध्ये कंपनी रोज डेटासोबत फ्री कॉलिंग आणि फ्री एसएमएस सुद्धा देत आहे. तसेच बीएसएनएलने आपल्या 998 रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारा डेली डेटा वाढवला आहे. कंपनीने या प्लानला पीव्ही 186 ज्या जागी लाँच केले आहे. 199 रुपयांच्या प्लान मध्ये पीव्ही 186 च्या तुलनेत दोन दिवसांची जास्त वैधता दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१९९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट
बीएसएनएलच्या नवीन प्रीपेड प्लान 30 दिवसांच्या वैधतेसह दिवसाला 2 जीबी डेटा मिळणार आहे. याव्यतिरिक्त, कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी वापरकर्त्यांना दररोज 250 मिनिटे दिली जातील. या प्लानमध्ये ओटीटी अॅपची सदस्यता घेतली जाणार नाही. त्याचबरोबर सर्व टेलीकॉम सर्कलचे वापरकर्ते 24 डिसेंबरपासून या योजनेचे रिचार्ज करु शकतील.

९९८ रुपयांच्या प्लानमध्ये आता रोज १ जीबी एक्स्ट्रा डेटा
१९९ रुपयांच्या प्लानला लाँच करण्यासोबतच कंपनीने ९९८ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणाऱ्या डेली डेटाला १ जीबी ने वाढवले आहे. आता या प्लानमध्ये युजर्संना रोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. याआधी केवळ २ जीबी डेटा मिळत होता. प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळण्याची सुरुवात २४ डिसेंबर पासून सुरू होणार आहे.

कंपनीने या प्लानला प्रमोशनल ऑफर अंतर्गत रिव्हाइज केले आहे. त्यामुळे यात मिळणाऱ्या १ जीबी एक्स्ट्रा बेनिफिट २३ मार्च २०२१ पासून रोलबॅक केले आहे. हा एक डेटा ओन्ली पॅक आहे. तसेच २४० दिवसांची वैधता मिळते.

बीएसएनएलने नोव्हेंबर महिन्यात 365 रुपयांची नवीन प्रीपेड प्लान लाँच केला होता. हा प्लान 365 दिवसांच्या कालावधीसह येते. या रिचार्ज पॅकसह कॉम्बोपॅक असेल, ज्या अंतर्गत आपल्याला दररोज 250 मिनिटांपर्यंत अमर्यादित व्हॉईस कॉलिंग मिळेल. तसेच, 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएस दररोज उपलब्ध असतील. कॉम्बोपॅक अंतर्गत कंपनीने देऊ केलेली मोफत सेवा 60 दिवसांच्या वैधतेसह येते. या ऑफरअंतर्गत 250 मिनिटांचा फ्री व्हॉईस कॉलची मर्यादा संपल्यानंतर वापरकर्त्यांना बेस टॅरिफ योजनेनुसार रिचार्ज करावा लागेल. या ऑफरमध्ये दररोज 2 जीबी डेटा गमावल्यानंतर वापरकर्त्यांची इंटरनेट गती 80 केबीपीएस पर्यंत कमी होईल.