काँग्रेसला मोठा धक्का : प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; ही दोन नावे चर्चेत
राजकारण

काँग्रेसला मोठा धक्का : प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; ही दोन नावे चर्चेत

अहमदाबाद : काँग्रेसला एकामागून एक मोठमोठे धक्के बसत असतानाच आणखी एक धक्का बसला असून गुजरातचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी राजीनाम दिला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये काँग्रेसची डोकेदुखी आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार बसला. त्यानंतर आता गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात तोंडावर असतानाच गुजरातचे प्रदेशाध्यक्ष व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गुजरामध्ये अहमदाबाद महापालिका निवडणुकीसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. गुजरात विधानसभा निवडणूनंतर काँग्रेसची राज्यातील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला मानहानीकारक हार पत्करावी लागली. पोटनिवडणुकीनंतर काँग्रेसचे गुजरात प्रभारी राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे पराभवाची कारणमीमांसा करणारा एक अहवाल पाठवला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये ही पडझड होताना दिसत आहे. अमित चावडा यांनी गुजरातचे प्रभारी राजेश यादव यांना बुधवारी आपला राजीनामा दिला.

गुजरातमध्ये काँग्रेसची कामगिरी सातत्यानं निराशाजनक होत असून, पक्षातूनच प्रश्न उपस्थित केले जात आहे. सातत्यानं पक्षावर टीका होत असल्यामुळेच अमित चावडा यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा विधासभाध्यक्ष परेश धनानी यांच्याकडे सोपवला.

चावडांच्या राजीनाम्यानंतर दोन नावे चर्चेत
चावडा यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानं आता दोन व्यक्तींची नावं चर्चेत आहे. यात शैलेश परमार पूजा वंश आणि अश्विन कोटवाल यांची नावं स्पर्धेत आहेत.