सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; पाहा आजचे दर
लाइफफंडा

सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात होणारी घसरण ही सातत्याने चालूच आहे. अनेक दिवसांच्या चढ-उतारानंतर सोन्याचे भाव आता 44 हजार रुपयांहून खाली आले आहेत. तर चांदीचा भावही कमी झाला आहे. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 44 हजार 113 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा दर 63 हजार 212 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने दरात घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज दिल्ली सराफा बाजारात आज 31 मार्च 2021 रोजी सोन्याचा भाव 188 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या अर्थात 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 43,925 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. दिल्ली सराफा बाजारात सोनं 7 ऑगस्ट 2020 रोजी सर्वोच्च 57,008 रुपयांवरुन आता 13,083 रुपये प्रति 10 ग्रॅमने खाली आलं आहे.

चांदीच्या किंमतीत आज 771 रुपये प्रति किलोग्रॅमची घसरण झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी चांदी भाव 62,441 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर ऑगस्ट 2020 रोजी सर्वोच्च 77,840 रुपयांवरुन 15,399 रुपये प्रति किलोग्रॅमने घसरले आहेत.