६४ मेगापिक्सल कॅमेऱ्याचे ‘हे’ जबदस्त स्मार्टफोन, तेही तुमच्या बजेटमध्ये
लाइफफंडा

६४ मेगापिक्सल कॅमेऱ्याचे ‘हे’ जबदस्त स्मार्टफोन, तेही तुमच्या बजेटमध्ये

नवी दिल्ली : स्मार्टफोन युजर्सं नेहमीच बेस्ट कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असतात. युजर्सची मागणी लक्षात घेता यावर्षी जवळपास सर्वच कंपन्यांनी आपले ६४ मेगापिक्सल कॅमेऱ्याचे सेटअपचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. ६४ कॅमेऱ्याच्या फोनसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागतात. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला असून या फोनची किंमत २० हजारांपेक्षा कमी आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टेक्नो कॅमॉन 16
देशातील सर्वात स्वस्त 64 मेगापिक्सल रियर कॅमेरा फोन म्हणून टेक्नो कॅमॉन 16 स्मार्टफोनची ओळख आहे. हा फोनमध्ये 4 जीबी रॅम मेमरी आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.10,999 रुपये आहे. टेक्नो कॅमॉन 16 मध्ये चार कॅमेरा सेन्सर आणि ‘+’ आकारात एलईडी फ्लॅशसह बॅक पॅनेल स्क्वेअर आकाराचा मागील कॅमेरा सेटअप आहे. एलईडी लाईट असणारा हा फोन एफ / 1.79 अपर्चरसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी रीअर कॅमेरा लेन्स, एफ / 2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सल डीप्थ सेन्सर, समान अपर्चरसह 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि एफ / 3.5 अपर्चर क्षमतासह एआय लेन्स आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी टेक्नो कॅमॉन 16 स्मार्टफोन एफ / 2.0 अपर्चरसह 16 मेगापिक्सेल सॅमसंग आरजीबी एस 5 के 3 पी 9 सेन्सरला सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी F41
सॅमसंगच्या या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज या फओनमध्ये दिला आहे. ६.४ इंचाचा सुपर इनफिनिटी यू डिस्प्ले दिला आहे. या फोनची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

मोटोरोला वन फ्यूजन प्लस स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरासह जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच एक ८ मेगापिक्सलचा, एक ५ मेगापिक्सलचा आणि एक २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर दिला आहे. मोटोरोलाच्या या फोनची किंमत १७ हजार ४९९ रुपये आहे.

रेडमी नोट ९ प्रो मॅक्स
या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,020mAh ची बॅटमोटोरोला वन फ्यूजन प्लसरी दिली आहे. फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबीचा इंटरनल स्टोरेजच्या या फोनची किंमत अॅमेझॉनवर १६ हजार ९९९ रुपये आहे.