ऑक्सिजनअभावी दीड तासात विदर्भातील ‘या’ रुग्णालयात १५ जणांचा मृत्यू
बातमी विदर्भ

ऑक्सिजनअभावी दीड तासात विदर्भातील ‘या’ रुग्णालयात १५ जणांचा मृत्यू

गोंदिया : ऑक्सिजनअभावी अवघ्या दीड तासात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालयात घडली. महाविद्यालयातील वॉर्ड क्रमांक १,२, ३ व ४ येथील ऑक्सिजनचा साठा संपल्याने व अतिरिक्त सिलिंडर उपलब्ध नसल्याने १५ अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत नसल्याची बाब आरोग्य कर्मचारी आपल्या वरिष्ठांना वेळोवेळी कळवत होते. पण वरिष्ठांनी वेळीच लक्ष दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाल्यानंतर आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडारा सनफ्लॅग स्टील कंपनी येथून १०० सिलिंडरची गाडी रात्री ३ वाजता गोंदिया महाविद्यालयात पाठवली. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आणखी १८० सिलिंडरची व्यवस्था झाल्यानंतर ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत झाली.

ऑक्सिजन पुरवठा करणारे श्याम मित्तल यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, मी उत्पादक नाही तर पुरवठादार आहे. नेहमी १०० ते १५० सिलिंडर लागणाऱ्या गोंदियात सध्या ६०० सिलिंडरची मागणी होत आहे. माझे देयक थकीत असले तरी पुरवठा सुरूच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.