दिलासादायक! १५५ दिवसांतील सर्वात कमी अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! १५५ दिवसांतील सर्वात कमी अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत २५ हजार ७२ कोरोनाबाधित आढळले असून ३८९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर ४४ हजार १५७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २४ लाख ४९ हजार ३०६वर पोहोचली असून आतापर्यंत ३ कोटी १६ लाख ८० हजार ६२६ रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या ३ लाख ३३ हजार ९२४ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही रुग्णसंख्या गेल्या १५५ दिवसांत सर्वात कमी आहे.

दरम्यान, देशातील रिकव्हरी रेट ९७.६३ टक्क्यांवर असून विकली पॉझिटीव्हीटी रेट १.९१ टक्क्यांवर आहे. तर डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्क्यांवर आहे. आतापर्यंत एकूण ४ लाख ३४ हजार ७५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात गेल्या २४ तासांत ७ लाख ९५ हजार ५४३ जणांचं लसीकरण करण्यात आलं. दरम्यान, लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ५८ कोटी २५ लाख ४९ हजार ५९५ जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.