पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून चिठ्ठी लिहत जावयाची आत्महत्या
पुणे बातमी

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून चिठ्ठी लिहत जावयाची आत्महत्या

पुणे : पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने चिठ्ठी लिहत आत्महत्या केली आहे. राहत्या घरी पत्नीच्या ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवलं. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये तरुणाने सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून तसंच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. यावेळी त्याने पत्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

निखिल धोत्रे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. पुण्यातील शिवाजीनगर-गोखलेनगर भागात तो वास्तव्यास होता. वर्षभरापूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. निखिलने रविवारी संध्याकाळी राहत्या घरी पत्नीच्या ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवलं.

दरम्यान पोलिसांनी सुसाईड नोट सापडली असून यामध्ये त्याने सासुरवाडीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. तसंच कर्जबाजारी झाल्याचाही उल्लेख केला आहे. आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन मी समजून माझ्या बाळाला संभाळ, त्याची काळजी घे, असंही चिठ्ठीत लिहिलं आहे.