कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान; म्हणाले…
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान; म्हणाले…

जालना  : ”लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे, आता फक्त केंद्राच्या परवानगीकडे लक्ष आहे,” असे महत्त्वपूर्ण विधान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. तसेच, “कोरोना प्रतिबंधात्मक लस संपूर्ण राज्यभरात पोहोचवण्यासाठी सर्व कामं पूर्ण झाली आहेत. आता केंद्र सरकार आणि औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहत आहोत,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जालना येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील कोविड-१९ च्या लसीकरणाची माहिती दिली. केंद्राच्या धर्तीवर राज्यातही लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यातील लसीकरणाचा पहिला प्रयोग मुंबईतील केईएम रुग्णालयात केला जाणार आहे. प्रत्येक राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने वाहतूक आणि कोल्ड चेनची व्यवस्था करण्याची गरज आहे. ते काम अत्यंत जलद गतीने महाराष्ट्रात सुरु आहे. अदर पूनावाला यांनीदेखील महाराष्ट्रात कोल्ड चेन, प्रशिक्षण आणि वाहतुकीबद्दल जे टार्गेट दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलं असल्याचं सांगितलं आहे,”

मात्र राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. या परिस्थितीत रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासणार आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. लॉकडाउनच्या काळात अनेक महाविद्यालयं, स्वयंसेवी संस्था बंद होत्या. त्यामुळे रक्तदान शिबिरं होऊ शकली नाही. ज्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यासाठी पुढे यावं,” असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा १२ डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे. यानिमित्ताने रक्तसाठ्याचा तुटवडा भरुन काढता येईल असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.