देशात नव्या रुग्णांमध्ये घट; मृत्यूचे थैमान मात्र सुरुच
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात नव्या रुग्णांमध्ये घट; मृत्यूचे थैमान मात्र सुरुच

नवी दिल्ली : देशातील नव्या रुग्णांची संख्या ही काही प्रमाणात कमी झाली असली तरी मृत्यूचे थैमान सुरुच आहे. गेल्या २४ तासांत ०३ लाख ४८ हजार ४२१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. सातत्याने ४ लाखांच्या वर नवीन रुग्णांची नोंद होत असताना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झालेली दिसत असली तरी देशात मृत्यूचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. देशात एका दिवसात झालेल्या मृतांच्या संख्येनं नवा विक्रम नोंदवला आहे. देशात मंगळवारी ४ हजार २०५ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या आता २ लाख ५४ हजार १९७ वर पोहोचली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतात गेल्या ऑक्टोबर महिन्यात सापडलेला कोरोनाचा बी.१.६१७ हा उत्परिवर्तीत विषाणू वेगाने पसरत असून त्यामुळे जगभरातच जोखीम निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तंत्रज्ञ प्रमुख मारिया व्हॅन केरखोव यांनी सांगितले की, बी.१.६१७ हा मूळ विषाणूपेक्षा वेगाने पसरणारा असून तो घातक असल्याची माहिती मिळाली आहे.

या विषाणूचा मूळ प्रकार ऑक्टोबर २०२० मध्ये सापडला होता पण नंतर तोच विषाणू डिसेंबरमध्ये काही उत्परिवर्तनांसह सापडला होता. भारताली उत्परिवर्तनाचा हा विषाणू १९ देशांत पसरला असून अनेक देशांनी भारतात जाण्यास प्रवासबंदी लागू केली आहे.