NCB अधिकारी समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम?
बातमी मुंबई

NCB अधिकारी समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम?

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) गेल्या काही दिवसांपासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा सपाटा लावला आहे. वानखेडे यांच्यावर केलेल्या वैयक्तिक गौप्यस्फोटानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यातच आता समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. मलिकांच्या रोजच्या आरोपामुळे अखेर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रात समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम असल्याचा उल्लेख असल्याची माहिती सुत्राकडून मिळत आहे. मलिकांनी समीर वानखेडे यांच्याशी संबंधित काही कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेने दिलेला जन्म दाखला, शाळेचा दाखला यांचा समावेश आहे. त्या कागदपत्रांत समीर वानखेडे जन्मापासून मुस्लिम असल्याचा उल्लेख असल्याची माहिती सुत्राकडून कळते. दरम्यान, या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.