पुणे बातमी

पुणे हादरलं! सहा वर्षीय मुलीवर रिक्षा चालकाकडून बलात्कार

पुणे : एकामागून एक घडलेल्या बलात्काराच्या घटनांनी पुणे हादरलं आहे. आज (ता. ०९) आणखी एक संतापजनक घटना पुण्यात घडली. रेल्वे स्टेशन परिसरातील एसटी स्थानकाच्या फुटपाथवर आईच्या कुशीत झोपलेल्या सहा वर्षीय चिमुकलीला उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या घटनेतील आरोपी रिक्षाचालकाचे नाव सागर मांढरे (वय ३९) असे आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

परिमंडळ दोनचे पोलीस उपयुक्त सागर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीच्या सुमारास पुणे स्टेशन येथील एसटी स्थानकाच्या जवळ असलेल्या फुटपाथावर एक कुटुंब झोपले होते. तिथे आईच्या बाजूला एक सहा वर्षाची मुलगी झोपली होती. त्यावेळी आरोपी रिक्षाचालक सागर मांढरे याने त्या मुलीला उचलून, रिक्षाच्या मागील बाजूला ठेवले आणि रिक्षा सुरू करून पुढे निघून गेला. हा प्रकार तेथील एका रिक्षा चालकांने पाहताच, त्यांनी पोलिसांना माहिती कळविली व त्या रिक्षाचालक पाठलाग केला. मात्र अंधारामुळे रिक्षाचालक पुढे कुठे गेला हे त्याला दिसून आले नाही.

दरम्यान, आरोपी रिक्षाचालक सागर मांढरे याने त्या मुलीला सातारा रोडवरील एका इमारतीच्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपीचा शोध विविध पथकाच्या माध्यमातून सुरू असताना. सातारा रोडवर सहा वर्षाची मुलगी सापडली. त्यानंतर काही मिनिटात आरोपीला पकडून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.