भयानक ! पुण्यात भटक्या कुत्रीसोबत अनैसर्गिक कृत्य
पुणे बातमी

भयानक ! पुण्यात भटक्या कुत्रीसोबत अनैसर्गिक कृत्य

पुणे : पुण्यात एक अत्यंत क्लेषदायक प्रकार घडला आहे. एका इमारतीच्या सुरक्षारक्षकावर कुत्रीबरोबर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या विकृत कृत्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर पुण्यातील चतुश्रृंगी पोलिसांग गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका २८ वर्षीय प्राणीमित्र महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे. याठिकाणी बाबूराव मोरे नावाची 65 वर्षीय व्यक्ती एका सोसायटीमध्ये वॉचमन म्हणून काम करत आहे. त्यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार बाबूराव मोरे हे सोसायटीमध्ये रात्रपाळीला वॉचमनच्या ड्युटीवर असताना त्यांनी सोसायटीच्या गेटसमोर बसलेल्या एका भटक्या कुत्रीला पकडले आणि या कुत्रीबरोबर संबंधित वॉटमनने अनैसर्गिक कृत्य केलं. मॉडेल कॉलनीमध्येच राहणाऱ्या पल्लवी गौडा नावाच्या एका महिलेने हा संपूर्ण प्रकार पाहिला. त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दखल घेत कारवाई केली आहे.

या प्रकरणी महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तक्रार दाखल करून घेत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच बाबूराव मोरे या आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान ही घटना घडली त्याच्या आसपास सीसीटीव्ही नसल्याचंही तपासात समोर आलं आहे. पण प्रत्यक्षदर्शी महिलेनेच तक्रार दिल्यानं त्यांची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे.