तो सल्ला फडणवीसांनी पहिल्यांदा केंद्राला द्यावा : काँग्रेस
राजकारण

तो सल्ला फडणवीसांनी पहिल्यांदा केंद्राला द्यावा : काँग्रेस

पुणे : राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिका करतांना, मुख्यमंत्र्यांनी इतर देशांच्या कृतीची तूलना करावी असा सल्ला राज्य सरकारला दिला. त्यावरून काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी टीकेस ऊत्तर देणारे पत्रक जारी केले आहे. विरोधकांनी वास्तवता स्वीकारण्यास आवश्यक प्रगल्भता दाखवणे किमान संकटकाळी अपेक्षि असल्याचेही सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रांचे तथाकथित २०लाख कोटींचे आभासी व फसवे पॅकेजचे तुणतूणे वाजवण्यापेक्षा, फडणवीसांनी (केंद्राच्या कोरोना पॅकेजमध्ये) प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या हाती काय? आले हे देखील सांगावे व त्याची माहीती किमान केंद्राच्या नव्हे तर भाजपच्या तरी वेबसाईटवर जारी करावी व मौलिक सल्ले द्यावेत. निव्वळ राजकीय आरोप चिखलफेक करण्यापेक्षा वास्तवता मांडावी व ईतर देशांची ऊदाहरणे देतांना तेथील केंद्रीय सरकारांनी तेथील जनतेस थेट कशा प्रकारे आर्थिक मदत केली याचा बोध घेऊन ती बाब राज्यांच्या निवडणूकांमध्ये व्यस्त असलेल्या पंतप्रधान मोदींच्या निदर्शनास आणले तर कदाचित जनतेचे भले होईल, असे तिवारी यांनी जारी केलेल्या पत्रकांत म्हटले आहे.

कोरोना संकट काळात ही राजकारणाची संधीचा विडा ऊचलून, ऊठसूठ महाविकास आघाडी सरकारवर तथ्यहीन टिका करणे व हास्यास्पद आरोप करणे आता फडणवीसांनी थांबवावे, असे विनम्र आवाहन देखील गोपाळदादा तिवारी यांनी जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात केले आहे.