लस टोचून घेत अदर पूनावाला यांचा लसीकरणाच्या ऐतिहासिक मोहिमेत सहभाग
देश बातमी

लस टोचून घेत अदर पूनावाला यांचा लसीकरणाच्या ऐतिहासिक मोहिमेत सहभाग

पुणे : देशभरात आजपासून कोरोना लसीकरणाचा शुभारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. देशभरात लसीकरणाला सुरवात झाली असताना कोविशील्ड लसची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनीदेखील आज लस टोचून घेतली. लस घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाही हे अधोरेखित करण्यासाठी अदर पुनावाला यांनी लस टोचून घेतली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अदर पुनावाला यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी लिहिलं आहे की, जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला झालेल्या सुरुवात झाली याला यश लाभो अशी मी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सदिच्छा देतो. या ऐतिहासिक प्रयत्नांचा आणि लसीच्या सुरक्षेबाबतच्या आणि प्रभावीपणाच्या दखलपात्रतेने मला मोठा सन्मान मिळवून दिला आहे. आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत मी देखील कोविडची लस घेण्याच्या मोहिमेत सहभागी होत आहे.”

दरम्यान, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. सीरम इन्स्टिट्यूटकडून तब्बल एक कोटी दहा लाख इतके डोस पुरवण्यात आले आहे. एका डोसमागे दोनशे रुपये या दराने केंद्र सरकारने ही लस खरेदी केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या कोविशील्ड लसीचे पाच कोटी डोस तयार आहेत. परंतु हे पूर्ण पाच कोटी न पुरवता सध्या पहिल्या टप्प्यात फक्त एक कोटी दहा लाख डोस पुरवण्याचीच ऑर्डर केंद्र सरकारने दिली आहे.