दिल्लीतले मंत्री, आमदारच औषधं, ऑक्सिजनचा काळाबाजार करतायत; भाजपाध्यक्षांचा आरोप
देश बातमी

दिल्लीतले मंत्री, आमदारच औषधं, ऑक्सिजनचा काळाबाजार करतायत; भाजपाध्यक्षांचा आरोप

नवी दिल्ली : संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना दिल्लीचे भाजपाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिल्ली सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीतल्या औषधांचा आणि ऑक्सिजनचा काळाबाजार सरकारच करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गुप्ता म्हणाले, दिल्लीतले लोक केवळ श्वासासाठी लढत आहेत, भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेसारख्या इतरही संघटना लोकांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, दिल्ली सरकारचे मंत्री आणि आमदार हे औषधं आणि ऑक्सिजनचा काळाबाजार करण्यात गुंतलेले आहेत. दिल्लीमधल्या सध्याच्या या संकटाला दिल्ली सरकार आणि आम आदमी पार्टीचं जबाबदार आहे.

दिल्लीतली परिस्थिती लक्षात घेता तिथे गेल्या १९ एप्रिलपासून लॉकडाउन लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीन वेळा हा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. उद्या १० मे रोजी हा लॉकडाउन संपणार होता. मात्र करोना स्थिती पाहता हा लॉकडाउन आणखी आठवडाभर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता १७ मेपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. या आठवडाभराच्या लॉकडाउनमध्ये मेट्रो सेवाही बंद करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येत २३ ते ३५ टक्क्यांनी घट झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं.