दानिश सिद्धिकीच्या हत्येबाबत अफगाण लष्कराचा धक्कादायक खुलासा
देश बातमी

दानिश सिद्धिकीच्या हत्येबाबत अफगाण लष्कराचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली : पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा तालिबानी आणि अफगाणिस्तानच्या लष्करात झालेल्या चकमकीवेळी मृत्यू झाल्यानंतर वेगवेगळी माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी दानिश सिद्दीकी यांना भारतीय असल्याचं कळाल्यानंतर मारण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यातच आता अफगाण लष्कराकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दानिश सिद्दीकी हे तालिबान्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मरण पावले नाही, तर त्यांना तालिबान्यांनी पकडलं होतं आणि त्यानंतर त्यांना मारण्यात आलं, अशी माहिती अफगाण लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. इंडिया टुडेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. दानिश सिद्दिकी यांचा अफगाणिस्तानामधील हिंसेचे वृत्तांकन करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांच्या हत्येबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. दानिश सिद्दीकीला तालिबानी दहशतवाद्यांनी जिवंत पकडले. यानंतर, दानिश सिद्दीकींची ओळख पटवल्यानंतर तालिबान्यांनी त्याची निर्घृण हत्या केली. अफगाणिस्तान राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा दलाचे प्रवक्ते अजमल ओमर शिणवारी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

दानिश सिद्दीकी यांचं अपहरण करण्यात आलं वा पकडण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निघृर्णपणे हत्या करण्यात आली. हे प्रकरण सध्या तपासात आहे. दानिश यांची ज्या भागात हत्या करण्यात आली, तो परिसर तालिबान्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे साक्षीदार शोधण्यासाठी वेळ लागत आहे, असं अजमल ओमर शिणवारी यांनी म्हटलं आहे.