जो बायडन उद्या अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार
बातमी विदेश

जो बायडन उद्या अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन उद्या (ता.२०) अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. तर त्यांच्यासोबतच उपराष्ट्रपती म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस शपथ घेणार आहेत. बायडन यांचा शपथविधी समारंभाच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी जवळपास 35 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. अमेरिकी वेळेनुसार, सकाळी 10 वाजता शपथविधी सुरु होणार आहेत. दरम्यान, वॉशिंग्टनची वेळ भारतीय वेळेहून 10 तास 30 मिनिटं पुढे आहे. शपथ घेतल्यानंतर जो बायडन देशाला संबोधित करणार आहेत. या संबोधनाकरता बायडन पुढील 4 वर्षांसाठी राष्ट्राप्रतीचं त्यांचं व्हिजन सांगू शकतात. तसेच, जो बायडन कोरोनाविरोधातील लढा, अमेरिकेची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासोबतच राष्ट्राची एकता अबाधित ठेवण्यासाठी आपल्या योजनांवर प्रकाश टाकतील. अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथविधी समारंभ अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे. असं सांगितलं जात आहे की, या शपथविधी समारंभासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र अनुपस्थित राहणार आहेत. विशेष बाब म्हणजे बायडन राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेले काही विवादीत निर्णय पलटू शकतात. अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी बायडन यांनी आपल्या कार्यकाळापूर्वी 10 दिवसांत घेतलेल्या निर्णयांची यादी तयार केली आहे. या यादीत मुस्लिम देशांवर घालण्यात आलेलेल प्रतिबंध रद्द करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे.