प्रतिक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर
बातमी महाराष्ट्र

प्रतिक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी ०३ ऑगस्ट २०२१ रोजी जाहीर होणार आहे. सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा निकाल बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तसेच दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या वेटेजवर तयार करण्यात आला आहे.

या संकेतस्थळांवर पाहाता येईल निकाल
https://hscresult.11thadmission.org.in
https://msbshse.co.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in
याशिवाय www.mahresult.nic.inhttps://msbshse.co.in या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकालाशिवाय निकालाबाबततची अन्य सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

विद्यार्थ्यांना परीक्षेआधी मिळालेल्या सीट नंबरनुसार निकाल पाहता येणार आहे. गेले अनेक दिवस राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. विद्यार्थ्यांचे पुढील पदवी प्रवेश किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश या निकालावर अवलंबून असल्याने या निकालाकडे त्यांचे लक्ष लागून राहिले होते.