खूशखबर ! देशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वापरासाच्या मंजुरीसाठी शिफारस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

खूशखबर ! देशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वापरासाच्या मंजुरीसाठी शिफारस

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून प्रत्येकाला एकच प्रश्न होता की लस कधी येणार पण आता हळूहळू एकएका लसीच्या आपत्कालीन वापरांसाठी मंजुरी मिळत आहे. सीरमच्या कोविशिल्डनंतर देशाला आता भारत बायोटेकनं बनवलेली पहिली स्वदेशी लस कोवॅक्सिनही लवकरच उपलब्ध होणार आहे. केंद्रीय औषधं मानक नियंत्रण संघटनेच्या कोविड -१९ आजारासाठी बनवलेल्या विशेषज्ज्ञांच्या समितीने आज शनिवारी या लसीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी शिफारस केली आहे. यानंतर लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविडशिल्डला आत्पत्कालीन वापरासाठीही आजच शनिवारी संध्याकाळी मंजुरी देण्यात आली. त्यानंतर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या वापरासाठी शिफारस करण्यात आली असली तरी अद्याप याला मंजुरी देण्यात आलेली नाही. याबाबत लवकरच मंजुरीची घोषणाही होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, केंद्रीय औषध मानकं नियंत्रणच्या (सीडीएससीओ) विषय तज्ज्ञ समितीने (एसईसी) लसीच्या प्रतिबंधित आणीबाणी वापरासाठी परवानगी मंजूर करण्यासाठी डीसीजीआयकडे शिफारस केली आहे.