दिलासादायक बातमी! कोव्हॅक्सिन भारत आणि ब्रिटेन स्ट्रेनवर प्रभावी
देश बातमी

दिलासादायक बातमी! कोव्हॅक्सिन भारत आणि ब्रिटेन स्ट्रेनवर प्रभावी

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज चार हजार रुग्णांचा मृ्त्यू होत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात आढळून आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. कोणती लस नव्या स्ट्रेनवर प्रभावी यावरून प्रश्न विचारले जात होते. आता कोव्हॅक्सिन लस भारत आणि ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकनं केला आहे. […]

ब्राझीलचा भारताकडून लस घेण्यास नकार, मोठी ऑर्डर रद्द
बातमी विदेश

ब्राझीलचा भारताकडून लस घेण्यास नकार, मोठी ऑर्डर रद्द

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच ब्राझीलने भारताकडून लस घेण्यास नकार दिला आहे. ब्राझीलच्या आरोग्य नियामक संस्थेने भारतात तयार झालेल्या कोव्हॅक्सिनच्या आयातीस नकार दिला आहे. ब्राझीलनं या व्हॅक्सिनच्या दोन कोटी डोसची ऑर्डर दिली होती. अमेरिकेनंतर ब्राझील सर्वाधिक कोरोना प्रभावित देश आहे. मात्र भारत बायोटेक कंपनीच्या प्रकल्पाकडून सध्याच्या लस उत्पादन गरजा व अटींचे पालन होताना […]

लोकांचे लसीकरण करण्याऐवजी आपण लसी बाहेरच्या देशांना दान करत आहोत : दिल्ली उच्च न्यायालय
कोरोना इम्पॅक्ट

लोकांचे लसीकरण करण्याऐवजी आपण लसी बाहेरच्या देशांना दान करत आहोत : दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली : ”आपण एकतर लशी बाहेरच्या देशांना दान करत आहेत किंवा विकत आहोत, मात्र आपल्या स्वत:च्या लोकांचे लसीकरण करत नाही. त्यामुळे या बाबतीत जबाबदारी व तातडी यांची जाणीव असायला हवी,” अशा शब्दात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारसोबतच लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही फटकारलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्या. विपिन संघी व न्या. रेखा पल्ली यांच्या […]

शरद पवारांनीही घेतली स्वदेशी बनावटीची कोरोना लस
कोरोना इम्पॅक्ट

शरद पवारांनीही घेतली स्वदेशी बनावटीची कोरोना लस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पवार यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर पवारांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस टोचण्यात आली. तब्बल अर्धा तास शरद पवार हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे […]

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोनावरील नवीन लस लॉन्च करणार; अदर पूनावाला यांचे संकेत
देश बातमी

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोनावरील नवीन लस लॉन्च करणार; अदर पूनावाला यांचे संकेत

पुणे  : कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्ड लसीच्या वापरला परवानगी मिळाली आणि संपूर्ण देशाला या महामारीतून बाहेर पडण्याचा एक आशेचा किरण दिला. आता पुन्हा एकदा एक नवा आशेचा किरण दिसण्याची शक्यता आहे. ते म्हणजे, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लवकरच कोरोनावरील नवीन लस लॉन्च करण्याची शक्यता आहे. याबद्दलचे संकेत खुद्द सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिले आहेत. […]

तर… त्यांनी कोव्हॅक्सिन लस घेऊ नये; भारत बायोटेकचा इशारा
देश बातमी

तर… त्यांनी कोव्हॅक्सिन लस घेऊ नये; भारत बायोटेकचा इशारा

मुंबई : केंद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना मंजुरी दिल्यानंतर देशभरात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधात लसीकरण मोहिमेला जोरात सुरवात झाली. मात्र तिसऱ्या टप्प्यात भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनच्या चाचण्यां पाहता लस टोचून घेणाऱ्या लोकांसाठी एक सूचना प्रसारित केली आहे. यामध्ये अनेक प्रकारची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. एका व्हॉलिंटिअरचा मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंबीय न्य़ायालयात गेले आहेत. तर एका […]

अखेर सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकमधील वाद मिटला
कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

अखेर सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकमधील वाद मिटला

नवी दिल्ली : फायझर, मॉडर्ना आणि आणि ऑक्सफर्डच्या लशी वगळून अन्य लशी ‘केवळ पाण्याइतक्या सुरक्षित’ अशी टीका ‘सीरम’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी केली होती. त्यानंतर भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा इल्ला यांनीदेखील पूनावाला यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ”लसीच्या २०० टक्के प्रामाणिक चाचण्या केल्या आहेत, आमच्यावरील टीका अनाठायी आहे. आम्ही २०० टक्के […]

तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होण्याआधीच लसीला मान्यता कशी दिली?; कॉंग्रेस नेत्याचा सवाल
राजकारण

तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होण्याआधीच लसीला मान्यता कशी दिली?; कॉंग्रेस नेत्याचा सवाल

नवी दिल्ली : “कोव्हॅक्सिनवर अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचणी झालेली नाही. या वॅक्सीनला अगोदरच मान्यता दिली गेली आहे हे धोकादायक ठरू शकतं. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं. सर्व चाचण्या होईपर्यंत याचा वापर करणं टाळायला हवं. दरम्यान भारत अ‍ॅस्ट्रॅजेनेका वॅक्सीनसह मोहीम सुरू करू शकतो.” असं म्हणत कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी मंजुरी दिलेल्या लसीबाबत […]

जागतिक महामारी विरोधातील भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण
राजकारण

जागतिक महामारी विरोधातील भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण

नवी दिल्ली : “जागतिक महामारी विरोधातील भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण! म्हणजे सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना डीसीजीआयच्या मंजुरी. या लसिना मंजुरी मिळाल्यामुळे एक स्वस्थ आणि कोविडमुक्त भारताच्या मोहीमेस बळ मिळनार आहे. या मोहीमेसाठी जीव तोडून प्रयत्न करत असलेल्या शास्त्रज्ञ-नवनिर्मात्यांना शुभेच्छा व देशवासियांचे अभिनंदन.” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारतात […]

गुड न्यूज: सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी
कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

गुड न्यूज: सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी

नवी दिल्ली : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही परवानगी मिळाल्याने देश्भारातील नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना तज्ज्ञ […]