विरुष्काच्या आवाहनला तुफान प्रतिसाद; 24 तासांच्या आत जमा झाली एवढी रक्कम
देश बातमी

विरुष्काच्या आवाहनला तुफान प्रतिसाद; 24 तासांच्या आत जमा झाली एवढी रक्कम

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये लोकांची मदत करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. विराट आणि अनुष्काने सात दिवसांच्या या मोहिमेत 7 कोटी रुपये जमवण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, पण मागच्या 24 तासांमध्येच त्यांना 3.6 कोटी रुपये जमा करण्यात यश आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विराट कोहलीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली. 24 तासांपेक्षा कमी वेळात 3.6 कोटी रुपये, खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी संघर्ष करा आणि देशाची मदत करा, धन्यवाद, असं विराट त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला.

काल म्हणजेच शुक्रवारी विराट कोहलीने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ‘आपला देश सध्या कठीण काळातून जात आहे. देशाला सगळ्यांनी एकत्र येण्याची आणि जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवण्याची गरज आहे. मी आणि अनुष्का मागच्या एका वर्षापासून लोकांचा त्रास बघत आहोत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही जास्तीत जास्त लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला,’ असं विराट आणि अनुष्का म्हणाले होते.

दरम्यान, विराट आणि अनुष्का यांनी त्यांच्या चाहत्यांना मदत करण्याचं आव्हान केलं आहे. चाहत्यांकडून आलेली मदतीची रक्कम एसीटी ग्रांट्सला दिली जाणार आहे. एसीटी ग्रांट्स ऑक्सिजन आणि उपचारांशी जोडल्या गेलेल्या सुविधा उपलब्ध करून द्यायचं काम करते.